Priyadarshi Academy website was launched by the hands of veteran actor Shri. Vikram Gokhale.

गिरिश परदेशी ह्यांच्या प्रियदर्शी अकॅडमीच्या संकेत स्थळाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विक्रम गोखले यांच्या हस्ते आज दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी जैन होस्टेल, बी.एम.सी.सी. कॉलेज जवळ, पुणे येथे दुपारी १२.३० वाजता करण्यात आले. या शुभप्रसंगी प्रियदर्शी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी, अक्षय बेंद्रे, तेजस इंदापुरकर, softy inc चे अक्षय चोरगे आणि स्वतः गिरिश परदेशी उपस्थित होते. 'www.priyadarshiacademy.com ह्या संकेत स्थळावर जाऊन नेटकरी प्रियदर्शी अकॅडमी बद्दल माहिती मिळवू आणि संपर्क साधु शकतील' अशी माहिती गिरिश परदेशींनी दिली. 'पुण्यात हिन्दी नाटक करु इच्छिणाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे व्यासपीठ आणि संधी उपलब्ध होत नाही. गिरिश परदेशी आणि प्रियदर्शी अकॅडमीच्या प्रयत्नातून हिन्दी नाटकांना नक्कीच चालना मिळेल. माझ्या त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा.' अश्या शब्दांत विक्रम गोखले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रियदर्शी अकॅडमी नाट्यप्रशिक्षण आणि नाट्यप्रसाराचं काम करणारी संस्था आहे. शुक्रवार, शनिवार, रविवारच्या वर्गांमुळे आय. टी. इंजिनिअर्स, डॉक्टर्स, वकिल अश्या विविध क्षेत्रातील लोकांना नाट्यप्रशिक्षण घेणे सोपे झाले आहे आणि घेत आहेत. प्रशिक्षणादरम्यान नाट्यविषयक (म्युझिक, सेट, लाइट्स डिझाइन, फिजिकल थिएटर, संहिता विश्लेषण, इत्यादी) गोष्टींचं सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी अतिथी मार्गदर्शक, प्रशिक्षक येऊन शिकवत असतात. दर तीन महिन्यांनी नाट्यप्रयोग सादर केला जातो. सप्टेंबरमधे मुन्शी प्रेमचंद लिखित 'सद्गती' ह्या कथेचे नाट्यरुपांतरण विद्यार्थ्यांनी सादर केले. सद्ध्या आणखी दोन नाटकांच्या सादरीकरणाची तयारी विद्यार्थ्यांकडून करुन घेतली जात आहे, डिसेंबर आणि जानेवारीत ह्या नाटकांचे प्रयोग होतील.